भजनी मालिका
← भजनांकडे परत

“पहिली माझी ओवी

“pahili majhi ovi

“पहिली माझी ओवी । परतून पाहिले दृष्टीने । देखिले निजरूप ॥१॥ दुसरी माझी ओवी । जे नाही मनी । लक्ष तुझे चरणी । लागीयेले ॥२॥ तीसरी माझी ओवी । लाभे सायुज्यता । हात तुझा माझा । सद्गुरुनाथा॥३॥ चवथी माझी ओवी । शून्य जेथे आटे वस्तु घनदाट मागेपूढे ॥४॥ पाचवी माझी ओवी । पाचही अणुआरांचा । पंचवीसीयांचा । रीघ नाही ॥५॥ साहवी माझी ओवी । सादृश्य देखणे । वरकड बोलणे । फोल झाले ॥६॥ सातवी माझी ओवी । साच वाटे मना । अंतरीच्या खुणा । काय सांगो ॥७॥ आठवी माझी ओवी । आठव नाही जरा । निर्गुण सोयरा । पर्णियेला ॥८॥ नववी माझी ओवी । नांदू मी लागले । परपुरुषा रतले । जीवेभावे ॥९॥ दहावी माझी । ओवी धाले माजे । मन डोळां दिसे ऊन । रात्रीमाजी ॥१०॥ म्हणे बाई निवृत्तीचे । देणे योगीवाचे खुणे । योगी जाणे ॥११॥” (ल.रा. पांगारकर संग्रहित)