भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई

nivrutti dnyanadev sopan muktai

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई । म्हणती ज्ञान कायी कथुनीया ॥१॥ भक्तिचीया बळे देव पैं जिंकला । ऋणात केला कैसा येणे ॥२॥ धन्य तो भाविक नामा आणि कबीर । रोहिदास चांभार बहिरपिसा ॥३॥ त्यांची पाय धुळी वंदिता कपाळी । वंशहि समुळी उद्धरती ॥४॥ नामा म्हणे मुक्ताबाई ऐका स्पष्ट । भक्तिहून श्रेष्ट आणिक नाही ॥५॥