भजनी मालिका
← भजनांकडे परत

निसुर संसार करून । होतों पोट भरून

nisur sansar karun | hoton pot bharun

निसुर संसार करून । होतों पोट भरून । केली विवसी निर्माण । देवपण दाखविलें ॥१॥ ऐसा काढिला नीस । काय म्हूण सहित वंश । आणिलें शेवटास । हाऊस तरी न पुरे ॥२॥ उरलों पालव्या शेवटीं । तेंही न देखवे दृष्टी । दोघांमध्यें तुटी । रोकडीचा पाडिला ॥३॥ तुकया बंधु म्हणे गोड । बहु जालें अति वाढ । म्हणोनि कां बुड । मुळ्यासहित खावें ॥४॥