भजनी मालिका
← भजनांकडे परत

निसंग निलज होई वो धांगडि

nisang nilaj hoi vo dhangadi

रचनाकार: संत महंमद · अभंग
निसंग निलज होई वो धांगडि ॥ मग तुज लागेल गोडि परब्रह्मिचि ॥१॥ या लोकीकाची लाज धरसिल धमकटि (?) ॥ तरि तुज जगजेठि नातुडति ॥ २ ॥ नश्वर शरीर याचि काये लाज ॥ साधुनि घेई काज ॥ जो जिवित्व आहे ॥३॥ देह विठलाचें झाड : उचिष्ट वोवळें ॥ ते काय सोवळे होईल तुज ॥४॥ सेख महमद म्हणे प्रकृति साजणी ॥ भाव धरूनि मनि जाविद्या सोडा ॥५॥