भजनी मालिका
← भजनांकडे परत

दयाळु म्हणवणें । हरि लाजीरवाणे

dayalu mhanavanen | hari lajiravane

रचनाकार: संत महंमद · अभंग
दयाळु म्हणवणें । हरि लाजीरवाणे । बिंदि वमनि । सेख महमद ॥१॥ चांगुण श्रीयाळ । वधीला त्याचा बाळ । सिरमागे केवळ । म्हणे रडों नका छ। मलकाई अर्जुन । जा विलें कर चरण । नेणसि तुं जीवन । निष्टु धेंडीया ॥२॥ सीधी चक्रवती मला । शस्त्रे विदारिला । नाहि करुणा तुला । ससाणा हासि ॥३॥ स्त्री पुत्राच्या हातें । कर्वतविलें चंद्र हास्या । येता अनुपाते । धड नेघसि ॥४॥ प्रल्हाद आवडला कस्यप विदारिला । न भजे जाणोन केला घात त्याचा ॥५॥ सिता भक्ते नेली त्याचि त्वां शांति केली । हे नव्हेस खोलि परमार्थाचि ॥६॥ कोंस मामा शरिरी स्वगे तले उरि । तुं घातक क्षेत्र बोकाचे न्याय ॥७॥ सुदाम्याचे घेऊन बळिस मागसि दान । दृपदि पासि वाण । घेऊन उदार ॥८॥ कर्ण परिक्षिती अक्रूर । उद्धव हरिश्चंद्र । रखुमांगद कबीर त्या कसून पाहिले ॥९॥ सांगता भक्त कोडि वाढेल बहुत प्रौढी । नामदेव आवडि मांडिली येथे ॥१०॥ देव भक्तांचा गता भक्त उदार दाता । लाज नये आनंता उदार म्हणवितां ॥११॥ सुखाचा मागता हा सळितो नाना परि । धन्य भक्ताचे निर्धारि जाण होतसे ॥१२॥ स्वसुपति वरि लोळण ॥ सळत्या लासळण । धर्म नष्ट लक्षणे श्री गोपाळा ठाई ॥१३॥ हरि सिवकारि तत्पर । भक्ता मुक्ति उधार । ऐसा लंड सिरजोर । दुसरा नाही ॥१४॥ ऐसा अव्यक्त खाडिल । भक्ति केला आमोल। रोख महमदिं सखोल । वर्णिला वाचे ॥१५॥