भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही कसे सोवळे सांगा जे मज कळे

tumhi kase sovale sanga je maj kale

रचनाकार: संत महंमद · अभंग
तुम्ही कसे सोवळे सांगा जे मज कळे । चंदनाचे टिके । व्यर्धे केले १ छ। पीत्याचे सिश्न मुत्राचे रोजन । ते वाटे येऊन पडलेति खोळे ॥छ । अशुद्धाचे आळे । विष्टेचे पेटाळे । नवमास विटाळे । वाढलें ते ॥२॥ गर्भाचि जाचणी आधोमुखें दुर्घाणी । कुंभपाके उकडोनि स्थुळ जाले ॥३॥ ऐसे शरीर वोवळे । ते कायें सोवळे। भरलि ढिसाळें । अविद्योचि ॥४॥ नश्वर शरीरा । गंधाक्षत करा । पाणीनाचे विश्व साधुविण ॥५॥ विषयांचि धार । पापाचे डोंगर । विधीचे पसर । नका दाऊं ॥६॥ संताप अनुराग । दोन्ही माहार मांग । अहंकारे हा धींग मांडिलासे ॥७॥ कल्पना माहारि वासना चांभारि । तुम्हा परोपरिं बाटविती ॥ ८॥ सकाल ज्या रांडा पेंढारणी भांडा । त्यानि तुमच्या तोंडा । बोडविले ॥९॥ संकल्प न्हावी । विकल्प दावि मिथ्या देवा देवि । नका करूं ॥१०॥ ऐसि अंगसंगें वागविता भींगे । का घेतलि सोंगे ब्राह्मणोचि ॥११॥ चंदना लावावे । तरि चंदन तसे व्हावे । नाहीतर गळावे । गर्भीहूनि ॥ १२ ॥ हृदयी नाम सडा । प्रेम बोधा गाढा । तो ब्राह्मण थोडा । विरळागत ॥१३॥ सेख महंमद साचे । बोलियेले वाचे । आचार विप्राचे । भावातळि ॥१४॥