भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुणाचें भेटी आलों सगुणासंगें । तंव झालो प्रसंगीं गुणातीत

nirgunachen bheti alon sagunasangen | tanv jhalo prasangin gunatit

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
निर्गुणाचें भेटी आलों सगुणासंगें । तंव झालो प्रसंगीं गुणातीत ॥ १ ॥ मज रूप नाहीं नांव सांगू काई । झाला बाई बोलूं नये ॥ २ ॥ बोलतां आपली जिव्हा पैं खादली । खेचरी लागली पाहतां पाहतां ॥ ३ ॥ म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी । सुखासुखी मिठी पडली कैसी ॥ ४ ॥