भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी । तेणें केलें देशधडी आपणासी

nirgunacha sang dharila jo avadi | tenen kelen deshadhadi apanasi

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
निर्गुणाचा संग धरिला जो आवडी । तेणें केलें देशधडी आपणासी ॥ १ ॥ अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें । एकलें सांडिलें निरंजनीं ॥ २ ॥ एकत्व पाहतां अवघेंचि लटिकें । जें पाहें तितुकें रूप तुझें ॥ ३ ॥ म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव । तुह्मा आह्मा नांव कैचे कोण ॥ ४ ॥