भजनी मालिका
← भजनांकडे परत

मूळद्वारी दादा स्थापिला

muladvari dada sthapila

मूळद्वारी दादा स्थापिला | गणपती माया ही | उत्पत्ती कैशी झाली ॥१॥ मायेचा बंबाळ जाये एकसरा । इच्याही आधारा सांगा दादा ॥२॥ ब्रह्मांड व्यापिले आकाश कवळिले । सर्व काही व्यापिले मायेनेचि ॥३॥ माया केसी दादा सांगता निर्गुण | मुक्ताबाई म्हणे मित्र फोडा ॥४॥