भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्तामुक्त दोन्ही आईक तो

muktamukta donhi aik to

मुक्तामुक्त दोन्ही आईक तो । कर्णी हरिनाम वर्णी सदा काळ ॥१॥ नाहीं काळ तेथें आम्हां वेळ कैची। हरिनामछंदाची गोडी थोरी ॥२॥ नाना विघ्नबाधा नाईकों आम्हीं । कदां निरंतर धंदा रामकृष्ण ॥३॥ मुक्तपणे मुक्त मुक्ताई । हरिनाम सेवीत सर्वकाळ ॥४॥