भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्ताबाई म्हणे देवा

muktabai mhane deva

मुक्ताबाई म्हणे देवा । तु विसावा जिव शिवा । गुण गौरव अनुभवा । आम्ही जाणो तुज ॥१॥ सत्य सत्य जनार्दन । सत्य सत्य नारायण । सत्य सत्य तु आमुचे धन । जगज्जीवन जगदाकार ॥२॥ ॥धृ॥ तुज वाचोनी त्रिभुवनी । दुजा न देखो नयको काणी॥ वेदशास्त्र पुराणी । अगाध महिमा तुझा ॥३॥ तु देवादी देव उत्तम । तु निज भक्ताचा विश्राम । शंकराचा आत्माराम । ऐसा नेम वेदाचा ॥४॥ तरीच भक्ताचा कॉवसा । पावसी तु हृषीकेशा । नाही दुजविण भरवसा । निश्चय ऐसा साच तू ॥५॥ तू परत्रीचे रुझा आगम । निगम विचारु । तुझ्या चिंतेने पारु । उतरे संसारु दुर्घट ॥६॥ विठोजी म्हणे मुक्ताबाई । मन समर्पिले माझे ठाई । तयासी जन्म मरण नाही। सत्य पाही निर्धारि ॥७॥ नामा म्हणे करुनी । स्तुती मुक्ताबाई चरण वंदीती॥ तव संत महंत विनविती । आदिमूर्ति विष्णुचि ॥८॥