भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोतियांचा चुरा फेंकिला अंबरीं

motiyancha chura phenkila ambarin

मोतियांचा चुरा फेंकिला अंबरीं । विजुचिया परी कीळ जालें ॥१॥ जरी पितांबरें नेसविलीं नमा । चैतन्याचा गाभा नीळबिंदू ॥२॥ तळीपरि पसरली शून्याकार जाली । सर्पाचिये पिली नाचूं लागे ॥३॥ कडकडोनि वीज निमाली ठायिचे ठायीं । भेटली मुक्ताबाई गोरोबाला ॥४॥ ज्ञानदेव म्हणे कैसी जाली भेट । ओळखिलें अविट आपण ॥५॥