भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेरु तळवटी पाच पिंपळ

meru talavati pach pimpal

रचनाकार: संत बोधले · अभंग
मेरु तळवटी पाच पिंपळ । खाले वरोडा सेंडा वरी मूळ रे ॥१॥ पाचाहि पिंपळा एकचि फळ । त्याणे पक्षि गिळिला समुळ रे ॥२॥ ऐक मी सांगेन पक्षियाची सोये । बाप नाही त्यासा भाये रे ॥३॥ हात नाही त्यासी पाय रे । तो पक्षीविण उडोनिया ये रे ॥४॥ त्याने त्रिभुवन गिळिले पाहे रे । तो विश्वची खेळत आहे रे । बोधला धरी त्याचे पाय रे ॥५॥