भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबाप निमाल्यावरी । घातलें भावाचे आभारी

mayabap nimalyavari | ghatalen bhavache abhari

मायबाप निमाल्यावरी । घातलें भावाचे आभारी । तोहि परि हरी । तुज जाला असमाई ॥१॥ हे कां भक्तीचें उपकार । नांदतें विध्वंसिलें घर । प्रसन्नता व्यवहार । सेवटीं हे जालासी ॥२॥ एका जीवावरी । होती दोनी कुटुंबारी । चाळवूं तो तरी । तुज येतो निर्लज्जा ॥३॥ तुकयाबंधु म्हणे भला । आणीक काय म्हणावें तुला । वेडा त्यानें केला । तुजसवें संबंधु ॥४॥