भजनी मालिका
← भजनांकडे परत

मंगळ ते नाम मंगळ ते धाम

mangal te nam mangal te dham

मंगळ ते नाम मंगळ ते धाम । मंगळ पुरुषोत्तम मंगळची ॥१॥ मंगळ ते तीर्थ मंगळ ते क्षेत्र । मंगळ पवित्र नामघोष ॥२॥ मंगळ ते भक्त मंगळ कीर्तनी । मंगळ चक्रपाणी गाती नाम ॥३॥ मंगळ सोहळा वैष्णवाचा हाट । मंगळ ती पेड पुंडलिक ॥४॥ मंगळ नरनारी ओवाळती हरी । मुक्ताई उभीद्वारी मंगळाच्या ॥५॥