भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या भावें केली जोडी । च सरेची कल्प कोडी

majhya bhaven keli jodi | cha sarechi kalpa kodi

माझ्या भावें केली जोडी । च सरेची कल्प कोडी । आणियेलें धाडी । घालूनि अवघें वैकुंठ ॥१॥ आतां नलगे यावे जावें । कोठें कांहींच करावें । जन्मोंजन्मीं सुखें खावें । बैसोनसें जालें ॥२॥ असंख्य संख्या नाहीं पार । आनंदें दाटलें अंबर । न माये अपार । त्रिभुवनीं सांठवितां ॥३॥ अवघें भरलें सदोदित । जालें सुखाचें पर्वत । तुकयाबंधु म्हणे परमार्थ । धन अद्‌भुत सांपडलें ॥४॥