भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुरंगिणी आपुली बालके सांभाळी

kurangini apuli balake sambhali

रचनाकार: संत बोधले · अभंग
कुरंगिणी आपुली बालके सांभाळी । तैसा वनमाळी आत्मालागी ॥१॥ बहुत माझे लळे पुरविले सकळ । माउली कृपाळ अनाथांची ॥ २ ॥ उपकार सांगता नलगे आत पाहाता । सकल माझी चिंता दूर केली ॥३॥ काये गा मी सांगो सांगता गा नये । सकाळ बाप माये पांडुरंग ॥४॥ सर्वा परि माझी पुरविली आस । चुकविला गर्भवास बोधला म्हणे ॥५॥