भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्ण नाटक नाटक । याने ठकिले बहुत लोक

krushna natak natak | yane thakile bahut lok

रचनाकार: संत बोधले · अभंग
कृष्ण नाटक नाटक । याने ठकिले बहुत लोक । आवघे करुनि दावी एक । कैसा चालक देहिचा ॥१॥ भाविका दावितो कवतुक । बाळ्या भोळ्या भोगवि सुख । हारितो त्यांचे जन्म दुःख । सुखसमाधी बैसवी ॥ २॥ गोपाळामाजी क्रीडा करी । सवे गोपिका सुंदरी । हात टाकुनी खांद्यावरी । कैसा रळिया करितसे ॥ २॥ कोणा न कळे याचा पार । भुलवितो नरनारी । बळे चुकवी जन्मफेरा । आढळपदी बैसवी ॥४॥ बोधला म्हणे भुलविले कैसे । बळच लाविले आपले पिसे । पूर्वपुण्ये ओढे कैसे । थोर भाग्य आमचे ॥५॥