भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं विपत्ति आपत्यां । आतां आमुचिया होतां

kanhin vipatti apatyan | atan amuchiya hotan

कांहीं विपत्ति आपत्यां । आतां आमुचिया होतां । काय होईल अनंता । पहा बोलो कांसया ॥१॥ बरें अनायासें जालें । सायासेंविण बोले चाले । काबाड चुकले । केलें कष्टावेगळें ॥२॥ बरा सांपडलासी वोजा । वर्मावरी केशीराजा । बोलायासी तुझा । उजुरचि नाहींसा ॥३॥ तुकयाबंधु म्हणे दगा । बरा दिला होता बगा । झडकरी चलागा । चांग दैवें पावलों ॥४॥