भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाली आत्मपूजा देव शेजे पहुडला

jhali atmapuja dev sheje pahudala

रचनाकार: संत बोधले · अभंग
झाली आत्मपूजा देव शेजे पहुडला । म्हणोनिया थोर थोर आनंद झाला ॥१॥ वैकुंठीचा देव कैसा पंढरिसा आला । पुंडलिकाचा भाव देखोनि तन्मय झाला ॥ २॥ धामणगावी भक्त एक थोर ऐकीला । गरुडावर बैसोनी कैसा धावत आला ॥३॥ बोधला म्हणे थोर आनंदु झाला । हृदयी प्रगटे बोधला निज निजेला ॥४॥