भजनी मालिका
← भजनांकडे परत

जै तुज मज झाली भेटी

jai tuj maj jhali bheti

रचनाकार: संत बोधले · अभंग
जै तुज मज झाली भेटी । तुझे पायी पडली माझी मिठी । पंढरीराया आता तु कैसा जासी । तुज ओढुनी बांधेन गळियासी ॥धृ॥ जये देखियेले तुझे मुख । गेली गेली माझी तान भुक। पंढरीराया ॥१॥ कानी देखियेली कुंडले । देखोनि मन माझे निवाले। पंढरीनाथा ॥ २॥ गळा देखिली वैजयंती माळा । माझ्या डोळियासी सुकाळ जाला ॥३॥ कंठी देखियेले कौस्तुभ । देखोनि सुख जाले अमाप ॥४॥ कटि देखियेले दोन्ही कर। देखोनी हारुषे जालो निर्भर ॥५॥ इटे देखियेले दोन्ही पाये । देखोनी मन स्थिर राहे ॥६॥ आम्हा पडता जडजुड । आपण उगवितो आमचे कोडे ॥ ७॥ आम्ही हिंडता रानीवनी । सवे विठ्ठल आमुचा धनी ॥८॥ आम्ही हिंडतो जिकडे तिकडे । आपण झाडितो काटे खडे ॥९॥ जेवु बैसवितो आपणा सांगती । ग्रास घालितो आपुल्या हाते ॥१०॥ दोघा निजता सुख शेजार । काये सांगो त्या सुखाची थोरी ॥ ११॥ लोक हसोन करिती काये । आम्हा जोडले जोडले तुज पाये ॥ १२॥ बोधला म्हणे बोध जाला । तै हा देहेच तुज वाहिला ॥१३॥