भजनी मालिका
← भजनांकडे परत

जड मुढ अज्ञानी विश्वास धरिला मनी

jad mudh adnyani vishvas dharila mani

रचनाकार: संत बोधले · अभंग
जड मुढ अज्ञानी विश्वास धरिला मनी । त्याचि तो धावणि केली बापा ॥१॥ गजेंद्र जडजीव स्मरला तुझे नाव । ऐकोनिया धाव घेतली कैसी ॥२॥ भक्ताचा भाव देखोनि पंढरिरावो । करितसे उपाव नाना परि ॥३॥ बोधला म्हणे देव भावाचा भोक्ता । येन्हवी सर्वथा नावडे काही ॥४॥