भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेंचि गुह्यज्ञान नामदेवा लाधलें

henchi guhyadnyan namadeva ladhalen

हेंचि गुह्यज्ञान नामदेवा लाधलें । कबिरानें कथिले चार युगी ॥१॥ तेंचि गुह्यगोष्टी सांगितली तुजा । विश्वासाचें बीज विटेवरी ॥२॥ गुरुपुत्र जाणती योगी सदा ध्याती । शिवादिक जपती हेंचि ध्यान ॥३॥ अठरा अभंगांची करोनी सनद । ठेवावी निबंध आपणां पायी ॥४॥ याचे पुढे ज्ञान सांगती पाखांडा । जळो बाई तोंड काळे त्यांचे ॥५॥ अंतकाळ समयी तीन दिवस उपोषण सायुज्यता जाण मुळीं होय ॥६॥ आतां हेचि गोष्टी न करी प्रकट । ठेवावी हे गुप्त आपणापाशीं ॥७॥ प्रगट करितां होय मात्रागमन । ज्ञानदेव म्हणे आण निवृतीची ॥८॥