भजनी मालिका
← भजनांकडे परत

हांसोनि सोपानें खुणाविल्या खुणा

hansoni sopanen khunavilya khuna

हांसोनि सोपानें खुणाविल्या खुणा । नामदेव पाहुणा आला असे ॥१॥ तयासी हो पाक पाहिजे पवित्र । भाजलें कीं कोरें कळों नेदी ॥२॥ मुक्तिकेचे पारखी तुम्ही आहां देवा । भाजुनि जीवा शिवा ब्रह्म करा ॥३॥ आनंदें लती करावरी कर नेणों । राहिलें करें कोण्या गुणें ॥४॥ निर्गुणापासोनी सगुणाची संगती नाहीं । स्वरूपस्थिति अंगा आली ॥५॥ म्हणे मुक्ताबाई हेरोनियां हेरा । हिरा किंवा गारा नेण बापा ॥६॥