भजनी मालिका
← भजनांकडे परत

चहुं युगामाजीसिद्ध संत झाले

chahun yugamajisiddha sant jhale

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
चहुं युगामाजीसिद्ध संत झाले । योगेंचि तरले होती तेही ॥१॥ नोहेंचि उद्धार राजयोगे वीण । घाले राम कृष्ण हरि हर ॥२॥ योगेंचि ते मुक्त शुकसनकादिक । नारद जनक शिव उमा ॥३॥ राजयोगी पुर्ण स्वामी दत्तात्रेय । जनार्दना दावी सिद्धमार्ग ॥४॥ योगेंनि साधक झाले स्वयें देव । जाणती वैष्णव स्वानुमवी ॥५॥ कवण चौपुडें तेथं सुरनर । न येचि ढेंकर तृप्तीविण ॥६॥ अनुभवें तेंचि होवोनिया आपण । स्थापिती कर्म ज्ञान भक्ति नाम ॥७॥ नेणोनि उद्धोध वेति भ्रम मुढ । आवडे तें वाड म्हणती हेंचि ॥८॥ धिक्कारिती विषय झाल्या गर्भ स्थीर । त्यागों नये घराचार म्हणुनी येरी ॥९॥ योगेविण प्राप्त कैवल्य तया नाश । बाह्मनामें ओस भक्ति ज्ञानें ॥१०॥ नलमे अक्षयसुख केलियांही कांहीं । व्यर्थनाम तें ही योगेविण ॥११॥ यागेंची होवोनि जपती तें नाम । नारदा वाल्मीक व्यास शीव ॥१२॥ न येता रुपासी आधी कैचें नाम । लक्षोनि श्रीराम गावें तया ॥१३॥ योगेंवीण नाहीं स्त्रियां पुरुषां गती । न चुके अधोगती करिता सर्व ॥१४॥ म्हणोनि गुरुसी व्हावें सर्वस्वे अर्पण । खेचरा शरण नाम ॥१५॥ म्हणे जनार्दन सावध हो उठी । उघडी भ्रम तो एकनाथ ॥१६॥