भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक आपण साधु झाले

ek apan sadhu jhale

एक आपण साधु झाले । येर कोण वाया गेले ॥ उठे विकार ब्रह्मी मुळी । अवघे मायेचे गा बळी ॥ माया समुळ मुरेल जेव्हा । विश्व ब्रह्म होईल तेव्हा ऐसे । समजा आदि अंती । मग सुखी व्हावे संती ॥ चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥