भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई

dnyanadev mhane aik muktabai

ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई सांगेन तू पाही गुरुमुखें ॥१॥ निगुर्णाचा बुंद सगुणी उतरला । कर्दम तो झाला एकाएकी ॥२॥ स्थापिलासे गोळा सगुणाचा सार । तयाचा आधार एक आहे ॥३॥ मूळद्वारी मूळी स्थापिला गणपती तयापाशी वस्ती निर्गुणाची ॥४॥ निर्गुण म्हणजे काय रेणूते अक्षर म्हणे ज्ञानेश्वर मुक्ताबाई ॥५॥