भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्काबाई

dnyanadev mhane aik mukkabai

ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्काबाई | सद्गुरुंचे पायी मन ठेवी ॥१॥ करी निजध्यास सोहंगाचा बाई | इंद्रियांसी नाही रीघ तेथे ॥२॥ सात हे आंत आठव्याच्या पोटी | नवव्या संगे गोष्टी करी बाई ॥३॥ मग दहावा सहज नवयासी भेटला | अकराव्यासी सांगू लागला गुजगोष्टी ॥४॥ करुनि उपोषण मूळद्वार जोन | लिंगस्थानी चरण ठेवी बाई ॥५॥ ब्रह्मांडातुन ओवा सोहंग | त्रिवेणी आसन घाली बाई ॥६॥ ॐ तोचि गुरु सोहं तोचि शिव या दोहींचा लाघव करी वो बाई ॥७॥ ऐक्य झाल्यावरीं उठेल बाळा | कोटी सूर्यकळा प्रकाशल्या ॥८॥ खेचरी हे मुद्रा नासाग्री दृष्टी स्वयंभू | पाठी पोटी भरला बाई ॥९॥ ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई या | परता नाही उपदेश आता ॥१०॥