भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्ये ते पंढरी पुन्ये पावन

dhanye te pandhari punye pavan

रचनाकार: संत बोधले · अभंग
धन्ये ते पंढरी पुन्ये पावन । जेणे तारियेले विश्वलोक ॥१॥ धन्ये तेणे पावन केले । आम्हासी दाखविले निज सुख रे ॥ २॥ धन्ये ते भीमा चंद्रभागा । धन्ये ते भूमी वैकुंठ रे ॥३॥ धन्ये पांडुरंग धन्य पुंडलिक । पुण्ये जाली उत्कृष्ट रे ॥४॥ धन्ये नामदेव नाम च भरला । हाता आले नवनित रे ॥५॥ संत साधुजन जेवविले जेणे । आवघे केले संतृप्त रे ॥६॥ तेथे वडिलाचे धान्य वाटत आहे । म्हणोनि कानी आइकिली मातु रे ॥७॥ ते देती न देत म्हणोनी । भित भित गेलो तेथ धणि भेटला अवचिते रे ॥८॥ त्याणे भेउ नको म्हणोनि नाभिकार दिल्हा । मस्तकी ठेविला हात रे ॥९॥ आमचे आम्हासि देवूनी । त्याणी सुखी केले सावचित रे ॥ १० ॥ बोधला म्हणे घ्या रे घ्यारे तुम्ही । नका राहु दुचित रे ॥११॥