भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्या असोन घरी वाया फिरसिल फेरी

dhanya ason ghari vaya phirasil pheri

रचनाकार: संत बोधले · अभंग
धन्या असोन घरी वाया फिरसिल फेरी । मुळिचा धन्या नोळखेसी । हेचि गुन्हो सिरी ॥१॥ चाल निरंजना सुख होईल मना । फिरोन पाहे नवे ग उमा । सबाळी आपल्या स्थाना ॥ २॥ सोडि लाज जाता उघडा घाली माथा । सदगुरुसौ शरण जाई। कृपा करिल आता ॥ ३॥ नव्हे नर नव्हे नार नाही तेथे योनी । हुरकोन गेले साबले मग हारपळली दोन्ही ॥४॥ बोधला म्हणे सांडी वाद वाचा करिसी सीण । आम्हा तुम्हा एकपणा कैचे भिनाभिन ॥५॥