भजनी मालिका
← भजनांकडे परत

चौदाशें वरुर्षे शरीर केलें जतन

chaudashen varurshe sharir kelen jatan

चौदाशें वरुर्षे शरीर केलें जतन । बोधाविण शिण वाढविला ॥१॥ नाहीं गुरुमंत्र नाहीं उपदेश । परमार्थासि दोष लावियेला ॥२॥ स्वहिताचें कारण पडियेलें जेव्हां । शरण आला तेव्हां आळंकापुरीं ॥३॥ गैनीनार्थे गुज दिलें निवृत्तीला । निवृत्तीचा जाला ज्ञानदेव ॥४॥ ज्ञानदेवें बीज वाढविलें जनीं । तेंचि आम्हीं तुम्हीं संपादिलें ॥५॥ म्हणे मुक्ताबाई तिहीं लोकीं ठसा । नामदेव ऐसा राहिला कां ॥६॥