भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंद्र चकोरांचा । पाळिता तयाचा

chandra chakorancha | palita tayacha

रचनाकार: संत बोधले · अभंग
चंद्र चकोरांचा । पाळिता तयाचा । तैसा देव आमचा पांडुरंग ॥१॥ माऊली बालका घडिघडी पाहे देखा । तैसा आमचा सखा पांडुरंग ॥ २॥ सकळ आमचा भार चालवितो दातार । काये उपकार सांगो आता ॥ ३॥ बोधला म्हणे देवा तुज मग नायक आहे । जन्मोजन्मी पाय दावी मज ॥४॥