भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्म जैसे तैशापरी आम्हा वेढिले भूति चारी

brahma jaise taishapari amha vedhile bhuti chari

ब्रह्म जैसे तैशापरी आम्हा वेढिले भूति चारी । हात आपला आपणा लागे । त्याचा करू नये राग ॥ जीभ दाताने चाविली । कोणे बत्तीशी पाडिली ॥ थोडे दुखावले मन पुढे उदंड साहाणे॥ चणे खावे लोखंडाचे । मग ब्रह्मपदी नाचे मन मारुनि । उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥