भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेटला अवचित भाग्यें राजयोगी

bhetala avachit bhagyen rajayogi

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
भेटला अवचित भाग्यें राजयोगी । पुसावे तयालागी सकळी प्रेमें ॥१॥ अथवा पडे कणी योगी हे आवांका । आणावे शिबिका गजरेशी ॥२॥ द्यावे अपार घन वस्त्रें अलंकार । पदार्थें उपचार राजभोग ॥३॥ देवो नये क्लेश दुःखद ते भोग । जेणे होय मंग संतोषासी ॥४॥ नेमें घ्यावें वर्षे द्वादश ठेवोनि । प्रेमे विनवोनि सकळीं नित्य ॥५॥ करों देवों नये श्रम योगियासी । आद्य हे देवासी वद्ययोगी ॥६॥ आवदे जें तेंचि पुरवावे सर्व । देवाचाही देव योगी ब्रह्मा ॥७॥ करावी सकळ योगियाचि सेवा । तेणे श्रीकेशवा तोष होये ॥८॥ सहज राजयोगी झालिया प्रसन्न । मिटे जन्म मरण भवबंध ॥९॥ येवोनिया योगी झालिया अव्हेर । तेणे सर्वेश्वर होय दुःखी ॥१०॥ न करविती शरण स्त्रियापुत्रादिका । जाती ते नरका कल्पवरी ॥११॥ अंतरविती योगी भेटोनि श्रीराम । दंडी म्हणुनी यम आत्मवैरी ॥१२॥ फिरोनि सकळां विनवावें सप्रेम । वर्णोंनि महात्म्य योगियांचे ॥१३॥ नेमें नारी नरा करवावें शरण । तेणें वाढे पुण्य फळ कृपा ॥१४॥ न करितां न सधे आत्मसहित । अंतरे अनंत नलमे कही ॥१५॥ अनन्य शरण झाले योगियासी । घडले सर्व त्यासी केल्यावीण ॥१६॥ झाली दग्ध पापें कोटी अगणीत । जोडले पर्वत पुण्याचे ते ॥१७॥ योगयाग सर्व तयासी घडले । कुळें उद्धरिलें बेताळीस ॥१८॥ झाले हरि हर वश तोचि मुक्त । करोनि आलिप्त पापपुण्यें ॥१९॥ योगी यांची सेवा करी ब्रह्मा स्वयें । भोगोनि ऐश्वर्य देहे गेहें ॥२०॥ नामें उपासना कमें तपें घोर । होती चमत्कार थोर जनीं ॥२१॥ देतां ताप देहा होती प्राप्त सिद्धि । परी ते उपाधी क्षणीकची ॥२२॥ न तरती त्रिशुद्धी तेणें आपणची । येरां उघ्घाराची मात कैची ॥२३॥ अक्षय निजसिघ्घी योगेंचि पं प्राप्त । व्हावें ब्रह्मीं मुक्त देहेंचि तें ॥२४॥ म्हणोनि शरण व्हावें उपेदशिकें आधीं । होवोनि पूर्ण बोधी तारावें जना ॥२५॥ म्हणे जनार्दन तरले असंख्य कोटी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥२६॥