भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरा जाणतोसी धर्मनीति । उचित अनुचित श्रीपति

bara janatosi dharmaniti | uchit anuchit shripati

बरा जाणतोसी धर्मनीति । उचित अनुचित श्रीपति । करुं येते राती । ऐसी डोळे झांकुनी ॥१॥ आतां जाब काय कैसा । देसी तो दे जगदीशा । आणिला वोळसा । आपणां भोंवता ॥२॥ सेवेचिया सुखास्तव । बळें धरिलें अज्ञानत्व । येईल येई परि हा भाव । ज्याचा आहे तुज आधीं ॥३॥ असेंच करूनी किती । नागविली नाहीं नीती । तुकयाबंधु म्हणे अंतीं । न सोडिसी ते खोडी ॥४॥