भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडीचे निजमुख नाम मी गाईन

avadiche nijamukh nam mi gain

रचनाकार: संत बोधले · अभंग
आवडीचे निजमुख नाम मी गाईन । अंतरी पाहिन निजरुप ॥१॥ नोहेसी वेगळा या प्राणा सर्वथा । नकळे पंढरीनाथ लीला तुझी ॥ २॥ काय उतराई तुझिया उपकारा । माझ्या विश्वंभरा पांडुरंगा ॥३॥ बोधला म्हणे देई प्रेमाची उकळी । गाईन वनमाळी द्वारकेचा ॥४॥