भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां हें न सुटे न चुके । बोल कं दवडिसी फिके

atan hen na sute na chuke | bol kan davadisi phike

आतां हें न सुटे न चुके । बोल कं दवडिसी फिके । जन लोक पारिखें । अवघें केलें म्यां यासाठीं ॥१॥ नये सरतां नव्हें भलें । तुझें लक्षण कळलें । बैसलासी काढिलें । देहाचें मुळीं दिवाळें ॥२॥ दिसतोसी बरा बोल कोंवळे । गुण मैदांचे चाळे । दिसतासी ये वेळे । काय करूं विसंबोनी ॥३॥ तुकयाबंधू म्हणे देखतां । अंध बधिर ऐकतां । कैसें व्हावें आतां । इतुकियाउपरी ॥४॥