भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकाशाचा शेंडा घार

akashacha shenda ghar

आकाशाचा शेंडा घार । रांधी मांडा काउळा वादी । कांदा कुल्लाळ भोजन करी ॥१॥ दिहा पडे चांदणें रात्रीं । पडे उष्ण चोर घरटी पाली । तराळ घाली खाण ॥२॥ सासुनें खादलें उंडे । सुन तरळे लेकी लासिली । जांवाई गडबडा लोळे ॥३॥ धमकत घुसळण घातलें पारी । वटेश्वरमुता म्हणे मुक्ताई अवधारी ॥४॥