भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि वो हरि गावांसि आले

aji vo hari gavansi ale

रचनाकार: संत बोधले · अभंग
आजि वो हरि गावांसि आले। गोपिका सहित आम्ही नयनी देखिले ॥ १॥ धृ ॥ एकीकडे कौरव येकीकडे पांडव । मधे उभे यादवराव ॥ २॥ दोही भागी गोपिका । करी घेऊनी टाळ। मध्ये उभे यादवराव । नृत्य करिती ॥ ३॥ बोधला म्हणे मी नयनी देखिले । देखोनी आळंगिले हृदयामाजी ॥४॥