भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकें चांगया फळ फळासी आलें

aiken changaya phal phalasi alen

ऐकें चांगया फळ फळासी आलें । येऊनियां नासून गेलें ॥१॥ सोडी सोडी भवाची भ्रांति । तेणें होय अज्ञान निवृत्ति ॥२॥ चांगा वटेश्वरीं फळला । विज्ञानफळीं परिपाका आला ॥३॥