भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामें तुमचीं गाऊं मुखें । राहों सुखे चितंनीं

namen tumachin gaun mukhen | rahon sukhe chitannin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नामें तुमचीं गाऊं मुखें । राहों सुखे चितंनीं ॥१॥ आणखी नेघों दयाल तरी । पढों वैखरीं गुण तुमचे ॥२॥ ठाको उभा संतमेळीं । करुं धुमाळी हरिकथा ॥३॥ निळा म्हणे नित्य नवी । सेवा घ्यावी कृपाळुवा ॥४॥