भजनी मालिका

भजने

नाना साधनें मंत्र तंत्र । उपासना यंत्र अवघड तें ॥१॥ म्हणोनियां हरिचें । भाविकां सुगम हरिभक्तां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नानापरी खेद आठविती मना । आतां नारायणा सिद्धि न्यावें ॥१॥ समाधीसी केली आरति पंचारती । राहिली निवृत्ति स्वरूपीं तुझ्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नानापरी दूत मारिती निष्ठूर । शस्त्रांचें दुस्तर धाय हाणती ॥१॥ अग्नींत घालिती पाणीये बुडविती । ढकलोनियां देता पर्वतशिखरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नानापरी मन आवरितों भारी । कांही केल्या हरि विसर न पडे ॥१॥ दृश्यादृश्याच्या दूर केल्या गोष्टी । उघडिली दृष्टि ज्ञानदेवें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नानापरी समजवितें न परी राहे श्रीहरी । दहींभात कालवोनि दिला वेगीं झडकरीं । कडेवरी घेऊनियां फिरलें मी द्वारोद्वारीं ।१॥

रचनाकार: संत एकनाथ

नापिकाचे परि वरी बरी बोडी । परि अंतरींची वाढी उणी नव्हे ॥१॥ तैसें माझें मन न राहे समूळीं । प्रपंच कवळी दाही दिशा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाभिस्थानीं ठेवा हृदयकमळीं पहावा । द्विदळीं अनुभवा एकभवा ॥१॥ अर्धमात्रा बिंदु पाहतां प्रकार । होऊनी साचार सुखी राहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाभीकमळीं चतुरानन । न कळे तया महिमान । तो साबडे कीर्तन । तेथें नाचे सर्वदा ॥१॥ नातुडे जो सदा ध्यानीं । योगयाग यज्ञहवनीं । अष्टांग योग करिता साधनीं । न लाभेचि सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम अनिरुद्ध जगीं तें प्रसिद्ध । ओहं सोहं बोध गिळोनि गाय ॥१॥ अहंकार सांडी नाम मुखें मांडी । साधन देशधडी करुनी जपें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम उपेंद्र सर्व देवांचा तो इंद्र । शुभ काळ वक्त्र जप सदा ॥१॥ तें नाम सोपें जपें कां रे वाचे । अहर्निशी साचें नाम जप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम एक उच्चारितां । गणिका नेली वैकुंठपंथा । नामें पशु तो तत्त्वता । उद्धरिला गजेंद्र ॥१॥ ऐसा नामाचा बडिवार । जगीं सर्वांसी माहेर । नामापरतें थोर । योगयागादि न होती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ