भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम अनिरुद्ध जगीं तें प्रसिद्ध । ओहं सोहं बोध गिळोनि गाय

nam aniruddha jagin ten prasiddha | ohan sohan bodh giloni gay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम अनिरुद्ध जगीं तें प्रसिद्ध । ओहं सोहं बोध गिळोनि गाय ॥१॥ अहंकार सांडी नाम मुखें मांडी । साधन देशधडी करुनी जपें ॥२॥ जनार्दनाच एक साधन सारुनी । जनार्दनचरणीं विनटला ॥३॥