भजनी मालिका
← भजनांकडे परत

येतियां पुसे जातियां धाडी निरोप

yetiyan puse jatiyan dhadi nirop

येतियां पुसे जातियां धाडी निरोप । पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥१॥ येंई विठाबाई आई माउलीये । निढळावरी कर ठेऊनि पालवीये ॥२॥ पिवळा पितांबर गगनीं झळकला । गरुडावरी बैसोनी माझ कैवारी आला ॥३॥ डोळ्यांतील बाहुली माझी विठाई झाली । घनानंद मूर्ति माझ्या ध्यानासी आली ॥४॥ विठोबाचें राज्य आह्मां नित्य दिवाळी । विष्णुदास नामा जीवेंभावें ओंवाळी ॥५॥