भजनी मालिका
← भजनांकडे परत

वांया हांव भरी गुंतले कबाडी । करिताती जोडी पुढीलाची

vanya hanv bhari guntale kabadi | karitati jodi pudhilachi

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
वांया हांव भरी गुंतले कबाडी । करिताती जोडी पुढीलाची ॥१॥ ऐसे तें वोंगळ देख आंधळे । भोगिताती बळें सुख दु:खं ॥२॥ नाशिवंत अवघे मानियेलें साच । करिती हव्यास जन्मोजन्मीं ॥३॥ चोखा म्हणे यासी काय उपदेश । भोगी नर्कवास कल्पवरी ॥४॥