भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐके गोणाई म्हणे केशिराज सदा अरज तुझें नामदेवा

aike gonai mhane keshiraj sada araj tujhen namadeva

रचनाकार: संत गोणाई · अभंग
ऐके गोणाई म्हणे केशिराज सदा अरज तुझें नामदेवा ।।१।। संसारादि यासी नायडेचि कांहीं मिठीच वो पायीं घातलीसे ||२|| नेणों याच्या जीवें घेतलेसें कांही लोळणींच पायीं पातलिये ॥३॥ पुमे वो जीवी काय काय आवडे उमगोनि कोर्डे नेई पासी ॥४॥ देतां कांही न मागे नसतां कांहीं नेथे गुज न सांगें अंतरीचें ॥५॥ जन्मोनि सांकडे घातलें वो कैसे गिलि मज ऐसें वाटतसे ||६|| मी भावासि भुललों सांपडलों वाचे हातीं करिल काय अंतीं न कहीं ||७|| एक वेळ मज सोडवीं या पासोनी। दे कां मज लागोनि जीवदान ॥८॥ माझिये पे बोले मज गोविलें जातें आगिलें अनाथ म्हणोनि ||९|| अंगोळिये धरितां खांदा बोगिये आतां माझें केलें न चले कांहीं ।।१०।। तूं आपुलिया मनीं विचारूनि पाही । नामा आपुला नेई आवडता ।।११।। माय लेक दोघे साम्राज्य करा । घ्यावें धरणीवरी सुख याचें ||१२|| कठिण बोल तुझे बहूसाळ ऐकिले। नाहीं त्वां गे पाहिलें मागेंपुढे ।।१३।। आतां तुझी कैसी झांकोळिली माया। मज करिसी वायां इष्ट तूं गे ||१४|| ऐसें देवाचें बोलणें ऐकोनि उदास । नाम्या जाले क्लेश तयेवेळीं ।।१५।। नामा म्हणे देवा ऐसे पैसों घडे सुशीहि पे बुडे तरी न सोडी तुज ।।१६।।