भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुंदर मुखकमल कस्तुरी मळवटीं । उभा देखिला तटीं भीवरेच्या

sundar mukhakamal kasturi malavatin | ubha dekhila tatin bhivarechya

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
सुंदर मुखकमल कस्तुरी मळवटीं । उभा देखिला तटीं भीवरेच्या ॥१॥ मकराकार कुंडलें श्रवणीं ढाळ । देती गळां वैजयंती मुक्तमाळा ॥२॥ शंख चक्र गदा पद्म चहूं करीं । गरूडवाहन हरी देखियला ॥३॥ चोखा म्हणे सर्वं सुखाचें आगर । निरा भिवरा तीर विठ्ठल उभा ॥४॥