भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाची सुखराशि पंढरीसी आहे । जावोनियां पाहे अरे जना

sukhachi sukharashi pandharisi ahe | javoniyan pahe are jana

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
सुखाची सुखराशि पंढरीसी आहे । जावोनियां पाहे अरे जना ॥१॥ अवघाचि लाभ होईल तेथींचा । न बोलावे वाचा मौनावली ॥२॥ अवघिया उद्धार एकाचि दरूशनें । भुक्तिमुक्ति केणें मिळे फुका ॥३॥ प्रत्यक्ष चंद्रभागा अमृतमय साचार । जडजीवा उद्धार पहातां दृष्टी ॥४॥ चोखा म्हणे आनंदें नाचा महाद्वारीं । वाचे हरि हरि म्हणे मुखें ॥५॥