भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा

shuddha chokhamela | kari namacha sohala

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा ॥१॥ यातीहीन मी महार । पूर्वी निळाचा अवतार ॥२॥ कृष्णनिंदा घडली होती । म्हणोनि महार जन्म प्राप्ती ॥३॥ चोखा म्हणे विटाळ । आम्हां पूर्वींचें हें फळ ॥४॥