भजनी मालिका
← भजनांकडे परत

ॐ कार अक्षरबीजरे

om kar aksharabijare

ॐ कार अक्षरबीजरे । अमित्य भुवनीं प्रकाशुनि गेलेंरे । तें मकराचे पोटीं आहेरे ॥१॥ उकाराचा शेंडा पाहीरे । एकविसा मंदराचळा भेदुनि गेलेरे । मा वेद बीज वेगळें परात्पर पाहेंरे ॥२॥ मागें बोलिलों तें ज्ञानरे । चोविसा अक्षरी संध्याकाळी सोंगरे । परी त्या अक्षराचें अमित्य आहेरे ॥३॥ चारि म्हणों तरी नव्हेरे । साही म्हणों तरी भूललीं बापुडी । मा अठरांची दशा ते काईरे ॥४॥ दाहा श्रुती शिऊ बोलरे । आठरा श्रुति विष्णुचें वचन परि कल्पांती अक्षर न सरेरे ॥५॥ पूर्णापूर्ण ऐसें ब्रह्म बोलतीरे । तेथें पूर्ण अपूर्ण दोन्ही नाहीं । मातें कांही बाहीं अक्षररे । तया रुप ना रेखा आहेरे ॥६॥ तेथें त्रिकाळ जतिगति नाहींरे । नाहीं इंद्र चंद्र नाहीं आकाश भूमीरे । नाहीं आप तेज वायो तेथेरे ॥७॥ तरी वेद अक्षर गिवसावें कैसेरे नगणित गुण गेलेरे ॥ सिध्दि ना साधक मंत्र ना तंत्र । मा तेथें जटा क्रम पद कैचेरे ॥८॥ स्थूळ न सूक्ष्म नव्हेरे धातु नव्हे मातु नव्हेरे । मा कांही नव्हे तें अक्षर होयेरे ॥९॥ पर नव्हें परतर नव्हेरे । जाति नव्हें अजाति नव्हे । मा कांही नहोनियां एक होयरे ॥१०॥ बुध्दि नव्हे शुध्दि नव्हेरे । वाट नव्हे घाट नव्हे मा घटाटीत नव्हें । मवाळा मवाळ नव्हे नव्हेरे ॥११॥ साच ना दृश्य नव्हेरे । दृश्य नव्हे मा अदृश्य नव्हेरे । वेदीं बोलिलें तें होयरे ॥१२॥ सप्तपाताळा तळ नव्हेरे । एकवीस स्वर्गाहुनी आगळेंचि आहेरे । बाविसांहुनी परतें पाहीरे ॥१३॥ तेथें नादु बिंदु नाहीरे । चक्षु पाद नाहीं कर देहरे । दिहादिक चतुर नाहीरे ॥१४॥ भ्रमु नाहीं भुली नाहीरे । ते सतराव्याचे कळे प्रकाशलेरे । परि तेथें मन होये ठायीरे ॥१५॥ आतां सातवें पांचवें बोलें ज्ञानरे । तेथें पांचही नाहीं मा सातही नाहीं । मा तें अक्षर शतसहस्त्रां वेगळे आहेरे ॥१६॥ मागें चौदा बोलियलीं साचरे । ज्ञानासि विज्ञान जाहालें मा शेखीं बुडाला तो वायारे ॥१७॥ मागें अक्षरें बोलिलीं बहुतेरे । पिंड ब्रह्मांड जयापासून जाहालें । परगुणीं व्यापिलें ज्ञान सुखरे ॥१८॥ सुखादि सुख तें म्हणोरे । तरि अमित्य वेदाची वाणी खुंटली । मा परीलक्षालक्ष नये परिमाणारे ॥१९॥ त्रिदशा त्रिदश पंचदशा पंचदश नेणतेरे तें शतसहस्त्रांचे शेवटीं आहे नाहीं ऐसे दिसेरे ॥२०॥ आत्मा परमात्मा दोन्ही सखेरे । ऐसें चतुरी बोलतां लोक भुलविलेरे । परि अनुमाना नये वेगळा आहेरे ॥२१॥ पासष्टि पुढें अद्वैत नेमूरे । द्वैत ना अद्वैत भेद ना अभेद अक्षरझेंपकु तोचि भला रे ॥२२॥ बुझों गेला पाहों गेलारे । तेथें दुसनावना तयासि जाहालें । त्या ठकाठक मौन्या मौन्य पडिलेरे ॥२३॥ तेथें जाणोनी नेणे पै जाहालेरे । मन इद्रियां लयो जाहाला । अमित्य तेज ध्वनी उमटलेरे ॥२४॥ गगना परतें अक्षर दिसेरे । दिसोन न दिसे तें वेदांचें देखणें । तेथें साहांसी शुध्दबुध्द परतेरे ॥२५॥ नव्या नऊव्यासि शून्यरे । ऐसें राधा जंत्र भेदावें कवणें । तें कृष्णावतारी भेदियेलें पुरुषोत्तमेरे ॥२६॥ आता नव्या नउ भाग करीरे । ते अर्जुनामुखीं घालता भागला । तें अक्षर निराक्षर । आकार उकार मकार माते वळलेरे ॥२७॥ सात बेचाळीस घालीरे । पांच विसा तेथें गुणाकारी आटलें निरालंब ना पावलें घटाघटीरे ॥२८॥ तें व्योमाकार रुप नव्हेरे । तेज नव्हे त्रिकुट नव्हेरे । मा गोल्हाट नव्हे । मंडळा मंडळी मंडळा परतेरे ॥२९॥ अमित भुवनें चाकें त्यासिरे । निरालंब आंख घालूनिया बैसे । ते तुरंगेविण अक्षर कैसें चालेरे ॥३०॥ तें नित्य नव्हें अनित्य नव्हेरे । आकारा खूण गुढारु गुढारीलें । परि त्या विवरीं न दिसे अक्षररे ॥३१॥ बारावें भेदुनिया जायेरे । तेराव्याचें अग्राअग्रीं दिसे । तें परेहूनि परतें आहेरे ॥३२॥ आठ कोटी लक्षी पाहेरे । तें मुक्त नव्हेरे अमुक्त नव्हे मा अक्षरही नव्हे सिध्द आहेरे ॥३३॥ पिवळे नव्हे पांढरे नव्हे काळे नव्हेरे । रंग रंगाकार नव्हे अनंतध्वनि नव्हे । अक्षर नि:शब्द निरंजन नव्हेरे ॥३४॥ षष्ठ नव्हे सप्त नव्हेरे । मन नव्हे पर नव्हेरे । तें बुडालें बुडोनी नव्हेरे ॥३५॥ सत्ताविसें एकतिसें दाटूनि पाहेरे । छत्तिसांचा चौभागीं भागों तरी अप्रमिता । अप्रमीत जाहालारे ॥३६॥ सहस्त्र शून्य सहस्त्रां ठायीरे । बावन अक्षरीं गुण निवडति । ते कूटस्थ कुटाकुटीं नाहींरे ॥३७॥ मागें बोलिलासि भु:भुकारुरे । स्वर ना भेद सत्य वेद रुप बोलियेले तूं आपणयाते नेणतां । नेणोनि म्हणविसी ब्रह्मरे ॥३८॥ विकासलें व्योमाकारे । तिन्ही देव तिन्ही वेद जाहाले । मा तरी खुण चुकोनियां माघारे मागुति मुरडलेरे ॥३९॥ हा अनुवाद नको बोलोरे । नष्टा हातीं निजपद दिधले । ब्रह्मअन्वयें सोडून नको बोलोरे ॥४०॥ वाडा परिस वाड आहेरे । एकुणासवे अक्षरी मंत्रा साधु गेलासी परि तें काहीं । नाहीं ऐसे जालेरे ॥४१॥ रकारीं बोध बोलसीरे । तेथे घटीतेविघटीतें के न पडेची । त्या मंडळांमंडळीं गुंतलासीरे ॥४२॥ नकारु रुप शून्यरे । सहस्त्रचिये वाटे एक फांळले । माते अक्षरासि भेदु नाहीरे ॥४३॥ यम नेम काय करिसीरे । गुरुमुखें सांगतां वाया भ्रमलें । आपणपा नाहीं शुध्दिरे ॥४४॥ भांबाविले मन बुडविलेरे । मार्गू ठावा न पडता उगलें । मध्येंचि बुडोनि आलेरे ॥४५॥ गति मति वेदु बोलेरे । सातवी मातृका सहस्त्रीं वाटियेली । तेथें गुणलयो जाहालारे ॥४६॥ दिधलें मन पांचा ठायीरे पांचे पांच भागु विभागु जाहाला । तेथें ब्रह्मरसु रसीं मुरालारे ॥४७॥ वासुकीमणी मंथन केलेरे । तिहीं देव तेथें संध्यावळी ठायीं बुडाले । मातरि सहस्त्रमुखीं लेखा कायसारे ॥४८॥ साहाव्याचि गोठी वळून पाहेरे । अगाध ब्रह्माच्या गोष्ठी । करिती सत्य ब्रह्म त्याच्या पोटीरे ॥४९॥ ध्याना कल्पितां न पाविजेरे । आपुला आत्मा शुध्द चैतन्य देखिल्या तेंचि तें । ब्रह्म ब्रह्माकार होयरे ॥५०॥ मधुर मधुर अनुभव रसुरे । येथें संवादु ना गोडि तिखट ना पैत्यतें अंबर अंबराकाररे ॥५१॥ हरि म्हणिजे ठकार शून्यरे । पांचवे पूढें बिंदुलें दिधलें । तें नववें पुसूनि जायरे ॥५२॥ विधि म्हणसि ध्याना अगोचररे । जयाचा एक्याण्णउ मातृका भेदिल्या तें त्रिपुटी फुटोनी जायरे ॥५३॥ योगि मंत्र येकु साधूरे । आटि जनीं तेथें उभें राहूनियां । अकराव्याचें तोंड मारीरे ॥५४॥ येणें जाणें परि नाहीरे । सिध्द साकार भाविसी काय । मा अयोगायोगु तें नव्हेरे ॥५५॥ नाटटा भाविसि कायरे । नकारशब्दें नामात्मक नाहीं । तें नहोनि जायरे ॥५६॥ पराहूनि परता आहेरे । अमित व्योममंडळें भेदूनि तें मातृकेचें नांव कायरे ॥५७॥ चेउ आलिया निजसुदा नव्हेरे । निज चेतविलें जागें निजविलें । दगदगी फुटीं घालीरे ॥५८॥ तेथें बावन्न त्रेपन्न सक म्हणतीलरे । त्यासि लावावया मा आणिक बंधु नाही रे ॥५९॥ यासीं उपावो नाहीं अपावों नाहीं रे । नाहीं नाहीं तेथें कांहीं तें घेऊनि राहीरे ॥६०॥ तत्त्वातत्त्वा भेदु नाहीरे । महातत्त्वाचे सामर्थे जाशील तेथे आपण नाहीं कांही रे ॥६१॥ एका शेंडा येका डिरिरे । एकतत्त्वें महत्तत्त्व ते तळातळ भेदियेले । वोंकारें भेदियेले परात्पररे ॥६२॥ सत्य व्योमा शून्य देई रे । चौदावें बुडवूनि घालूनि पाहे । मा पुढें वेद बीज सांगेनरे ॥६३॥ जटि ब्रह्मऋषि बोलतिरे । पदपदार्थ कर्म खंडी विखंड । मा त्यासि नकळे त्या अक्षराचे पारुरे ॥६४॥ कर्मकांडी एक बीज आहेरे । संकल्पीं विकल्पीं एको विष्णु बोले । परि ब्रह्मार्पण नाहीं ठायी रे ॥६५॥ एकुपदार्थ बोलेरे । तें चोविसाक्षरी संध्यावळी बीज मिरवलें । एकु ध्रुव ध्रुव म्हणति यजुरिरे । यजन याजन अध्ययन अध्यापन । दान प्रतिग्रहो नाहीरे ॥६७॥ रुकारु म्हणती मूळरे । आब्रह्म म्हणती परतल्या दृष्टि मा साम मागति फळरे ॥६८॥ सत्यलोकीं विरिंचि विदरेरे । शंकरें विश्वाचि प्राहुति केली । हरि करि ठेवा ठेवीरे ॥६९॥ बोध्य म्हणती निज रुप जाणेरे । गण म्हणति सिध्धु पातलियां । शक्तु म्हणे शक्ति पोटीरे ॥७०॥ कमळें घेऊनि उभेरे । उदयो अस्तु नमस्कारु करिती । मातें असक्यासी न पडे अक्षर ठावेरे ॥७१॥ एक शैव म्हणति शिवज्योतिर्लींग पाहोरे । भगता भागवता न पडेचि ठायीं । माते पावलें निवृत्तिचे पाय प्रसादीरे ॥७२॥ निवृत्ति म्हणे सोपाना भलारे । अक्षराचें वर्म अवघे पूर्णपक्ष जाहाले । तें अक्षर तुम्हांसि भेदलेरे ॥७३॥ मूळ सांडि शेंडा सांडि रे । न घडतां घटण घटाघटीं केली । तरी ब्रह्मब्रह्मीं चोखाळलेरे ॥७४॥ अचिंतन चिंतन प्यालीरे । ज्ञान सोपानाचा निवृत्ति चोढळी । तें अक्षर त्रिपन्नी तिन्ही मोडलीरे ॥७५॥ ब्रह्मसमुद्र घोंटिलारे । तृषेक्षुधेवीण पंचप्राण पै खादलेरे । तिसाव्यासि मारिलें तुम्हीरे ॥७६॥ धगधगीत ब्रह्मशास्त्र आहेरे । अमित ब्रह्माचे तेज प्रकाशित । तेज तेजाठायीं विरेरे ॥७७॥ एक रोप कूपीं उगवलारे । त्याचे अनंत गुण मा अनंत पार मा । तो विष्णु भला भलाभलारे ॥७८॥ ते दोघे कर्मधर्म साधक भलेरे । ते अमित्य भुवनें धांडोळितां भागले । परी ते निर्गुण अक्षराचि नलगे सोयरे ॥७९॥ आदिदेवी माया जालीरे । एक वैष्णवी म्हणती अध्दती । म्हणती चौथी तिघांसि खायरे ॥८०॥ निरंजनीं एकी उभीरे । सिध्द साधक मा वेदांत बोलिजे । ते रंजना संध्यावळी मायारे ॥८१॥ अठरावर्ण अठरा न्यातिरे । चहूंची वेदीं सांगितली संमति । ते निरालंबी नाहीं स्थितिरे ॥८२॥ सुयीच्या अग्रीं दाभण ठेवावेंरे । अमित्य ब्रह्मांडे तयावरी जालीं । ऐसी निज ब्रह्माक्षरीची नकळे मायारे ॥८३॥ मायाकोश आड जालेरे ते तेजी तेज फोडुनी गेले । साते संस्वरुप अक्षर कवणे ठायीरे ॥८४॥ चौदा चारि चौदा घालीरे चौदा चौके चौदा वांटूनि गेले । माते ब्रह्मांडाची वाट कोणरे ॥८५॥ अक्षरा मागें अक्षरसहस्त्र जालेरे । लक्षलक्षाची क्रोडी क्रोडीची अनंत वाटाघाटी । निघंटीं पाहिल्यारे ॥८६॥ चतुर बुध्दि सांगवलेरे । चतुरानन चौमुखीं खांचावला । पंचमुख सहस्त्र मुख खुंटावलेरे ॥८७॥ तळवा घोंटी जानु नाभि वक्षस्थळी कंठ शेंडे गेलेरे । शेंडिच्या आग्रीं चौदा भुवनें मावळलीं । ते विराट लया लक्ष गेलारे ॥८८॥ अटत घाटत घटिलीरे । तेथे नादु नाहीं स्पर्श नाहीं । कांही नाहीं ते अवघी लया पाहिरे ॥८९॥ ऐसा उत्पत्ति गोळकु । पिंड ब्रह्मांड गोळकु सांगितलारे । ठाऊकें नव्हे म्हणोनि बुडालें । त्या अवताराचा काय ठावोरे ॥९०॥ देवऋषि मुनि शुकादिकारे । साही अंगें बोलोनि गेले । मा त्या चहूंचा गड संदेह पडालारे ॥९१॥ तेथें सत्तावन्ने सहस्त्र धातूरे । एक ज्यापासूनि मोवितां भागले । अमिता मुखीं वर्णितां गेलेरे ॥९२॥ शून्य वोढिलें निरशून्य भेदिलें पाहारे । देवादेवो दैवतें बोलती । तें ब्रह्मज्ञान सोपाना कर्णपुटीं पेरियेलें ब्रह्मरे ॥९३॥ श्रवणेंविण ऐकिलेरे । मनेंविण मन बुडालेरे । मागे गिवसितां गिवसितां स्वस्वरुपीं आहेरे ॥९४॥ निवृत्ति म्हणे ज्ञानसोपाना दोन्ही भागीं राहें । संध्यावळी अजपा मंत्रु साधन । त्याणें उपदेशें तें तें ब्रह्म पाहेरे ॥९५॥ म्हणती मनासी नयन आहेरे । ते मनचि नाहीं मा अवघे ब्रह्मचि पाहीं । मा माझा हस्तातळीं उभें राहारे ॥९६॥ अचिंतन चिंतूं नये । संध्या रागु मंत्र पंचकरणें मथिला । त्या अक्षरासि नाहीं भेदुरे ॥९७॥ तें ब्रह्माब्रह्म साररे । त्रिकुटा वेगळें गोल्हाटा वेगळें । न चुकत चुकलें पाहिरे ॥९८॥ रविसोममाथीं माथा बैसले ते आधारेवीण उदरेवीण सामावले आहेरे ॥९९॥ चिदप्रचिद तेजा तेज नव्हेरे । अमित भुवनें जयाचेनि आहारळलीं । तेथुनि नि:शब्दापासुनी वेद जाहालारे ॥१००॥ ब्रह्मवृक्षव्योमीं फुललारे । त्यासि शाखा ना मूळ ना बीज ना अंकूर । तें अक्षर फळलें बीण फळ देखारे ॥१०१॥ सहस्त्र खांदियांचें एक झाडरें । जयाचीं विश्वपत्रें विश्वशाखा । मा त्याचें अंगकूपीं एक ब्रह्म फळरे ॥१०२॥ यजुरि ऐशा ऐशा शाखा जाहाल्यारे । ऋगीं सप्त शाखा जाण बोलियेले । ते अथर्वण राहें श्याम फळरे ॥१०३॥ परि त्या अक्षरासि नलगे फूल फळ ज्याचि ते निष्कामीं निष्कर्मी फळेंविण कैसें फळेंरे ॥१०४॥ आणिक एक सांगेन गूढरे । त्यासि सोळा ना बारा । नवासि शून्य देतां दहा अकराही शून्य मिळेरे ॥१०५॥ ऐसें छत्तिसा गुणांचे बत्तिसावें वाटारे । मिळाले पंचीकरणीं मिळाले संध्यावळी परि त्या नकळे अक्षराचा भेदुरे ॥१०६॥ एकावन्नें बावन्ने मिळालें सत्तावन्नेरे । परि तें अक्षर निरंजन निराकार निर्गुण । ऐसे गुणिती पैं ते शाहाणेरे ॥१०७॥ अडतीस पंचविशी पांच मारीरे । निरशून्याकारे भृंगा भेदून गेले । मा परि नि:शब्दीं परा वाट पाहेरे ॥१०८॥ धगधगित एक सुरि होतीरे । ते व्योमाचे पोटीं फोडूनि भेदली । ते अक्षरासि वाहे वाटरे ॥१०९॥ एक आप एक पररे । पिंडब्रह्मांडाचे अक्षरीं निवडलें । सातवें गोल्हाट भेदिलेंरे ॥११०॥ तेथें विजया एक राणीरे । काळातें खाउनी महाकाळ गिळिला । ब्रह्मवोवरीं तिचें नांवरे ॥१११॥ तेथें एक होता अक्षर सिध्दावळीरे । अंत काळ तप्त मुख जाला । शब्द ने देखे फिरोनी आलारे ॥११२॥ आतां एक सांगेन अमित व्योमावरि फुललेरे । त्या अक्षरा बांधूनि वदेंविण धरिलेरे । ज्ञान सोपानासि म्यां दिधलेरे ॥११३॥ ज्ञानज्ञानें भला म्हणवीरे । सोपान सिध्दि निधि ब्रह्म पावलारे । तेणे ज्ञाना ब्रह्मबोध जालारे ॥११४॥ अद्वैत पंथ कैसारे । ऐक्यवादु वेद बोल बोलतीं वचनें । ते मिळणी ब्रह्मीचे सांगेन त्रिसंध्याकाळीरे ॥११५॥ ते वर्ण कवणा नेघेपवेरे । अनुभविया अटक कुठले । मग ते ज्ञानी म्हणती वांयारे ॥११६॥ जेथें मौन्यामौन्य साध्य नव्हेरे । पांच माळनि सस्वरुप होतें । मा तेचि ते अनुभवची खुणरे ॥११७॥ मनीं शंका धरुं नको कांहीरे । चतुर्देहांसहित मन मावळी । मा तरि ब्रह्मबीज तूंचि होशीरे ॥११८॥ सा सा सा चौदावरि ठेवीरे । हां भेद कोणी जाणितला म्हणती । तरी त्यासी मानु मी देईन म्हणति निवृत्तीरे ॥११९॥ आतां एक गुह्य परम गुह्यरे । तें अक्षरां शेवटीं दाही दिशे नाहीं । तें सहस्त्र लक्षीं गुणी ते आहेरे ॥१२०॥ हें गुणीता शास्त्र जालें ज्योतिषीरे । ते वेदाच्या पोटीं धांडोळित अहाती । त्या अक्षराचा न कळे अंतीं अंतूरे ॥१२१॥ भडस्त्रिंग भडभिंग भयानक जालेरे । परि त्यासि सहस्त्रसिध्दि सहस्त्रमुखीं बुध्दि । मा बावन्नअक्षरा वेगळे तें वाटेरे ॥१२२॥ ऐसे अमित्य भुवनाचे साटे मावळलेरे । चंडाहुनि प्रचंड थोटावलें । तें अक्षराचे नकळे पारुरे ॥१२३॥ जै नि:शब्द अंकुर फुटेरे । वायुसी मोवणी आपासि भिजवणी । व्योमाचि ठेवणी कवण ठेवीरे ॥१२४॥ मनासि नाहीं मारणीरे । तेजासि नाहीं धरणी । धरुं गेला तो वांयाविण श्रमलारे ॥१२५॥ परि एक निर्वाण सांगेनरे । आम्ही तिघी मा जेथुनी तुषाकारलो । ते जीवनीं जीवन जैसें मिळोनि गेलें । मा तैसी परि जाली आम्हा तुम्हारे ॥१२६॥